नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बोखारा ग्रामपंचायत चे मतदान शांततेत पार पडले आणि लगेच दुसऱ्या दिवशी निकाल लागला त्यात काँग्रेस पक्ष समर्थीत रणजीत सिंह चौहान यांनी २३४२ इतकी मते घेतली तर भाजपा समर्थीत उमेदवार देवेंद्र ठाकरे यांना २२२२मते तर अपक्ष उमेदवार सुरेश कंभाले यांना ६६० नोटा ला ८० असे मतदान मिळाले यात काँग्रेस समर्थीत रणजीत सिंह चौहान यांनी भाजपा समर्थीत देवेंद्र ठाकरे यांच्यापेक्षा १२० मते जास्त घेऊन विजय मिळवला. ही निवडणूक काँग्रेस पक्षाने मां.जिल्हा परिषद नागपूर उपाध्यक्ष कुंदा ताई यांच्या नेतृत्वात लढवली होती कुंदाताई प्रत्येक प्रभागात स्वतः पदयात्रा करीत काँग्रेस ने केलेली विकासकामे बाबत माहिती देताना दिसत होत्या तर भाजपा ने हिंगणा वी स क्षेत्रात आमदार समीरभाऊ मेघे यांच्या नेतृत्वात अनेकठिकानी प्रमुख बैठका घेतल्या पण तरी देखील त्यांच्या उमेदवाराला अपेक्षित यश मिळाले नाही. देवेंद्र ठाकरे यांना जबर पराभव पत्करावा लागला., वॉर्ड क्रमांक 1 अनुसूचित जाती महिला प्रवर्ग साठी राखीव असताना येथे , वर्षा सहारे काँग्रेससमर्थीत २५३ मत मिळाली तर अपक्ष नाना कंभाले समर्थीत रीना पाटील यांना २०६मते मिळाली म्हणजेच काँग्रेस समर्थीत वर्षा सहारे ४७ मते घेऊन विजयी झाल्यात . वॉर्ड क्रमांक २ मध्दे भाजपा समर्थीत उमेदवार प्रशांत आवळे विरुद्ध बंडखोर काँग्रेस गट चे समर्थन असणारे नितीन आवळे, तसेच काँग्रेस पॅनल समर्थीत विजयपाल आवळे हा वॉर्ड अनुसूचित जाती पुरुष वर्गासाठी राखीव होता येथून भाजपा ने निकराचा लढा देत अपक्ष उमेदवार नितीन आवळे यांना ३४ मतांनी मांत दिली तर काँग्रेस समर्थीत विजय आवळे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले, वॉर्ड क्रमांक ५ सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी राखीव असल्याने येथे भाजपा समर्थीत उमेदवार आल्तमश खुर्शीद खान यांना ६४३ मते मिळालेत, तर काँग्रेस समर्थीत उमदेवार शादाब अब्दुल वाहिद खान यांना ३८४ मते मिळालेत अपक्ष अजय बारइ यांना २०८, अपक्ष रोशन शेंडे यांना ७६ नोटा ला ५२ मते मिळाली एकूणच या प्रभागातून आल्तमश खुर्शीद खान यांना त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनल उमेदवार पेक्षा तब्बल २५९ मते जास्त घेऊन विजयश्री खेचुन आणली.
एकूणच काँग्रेस च्या बोखारा पोटनिवडणुकीत विजयाने कार्यकर्ता मध्दे उत्साह संचारला आहे


