चक्कीखापा रोड, गोधनी पहाडी च्या रत्नागिरी विहाराचा वर्धापनदिन सोहळा संपन्न
नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
चक्की खापा रोड गोधनी येथील पहाडीवर असलेले अतिशय पुरातन बुद्धविहार, रत्नागिरी महाविहार जीर्णोद्धार यापूर्वीच, भदंत भिक्खू संघांनी मिळून केला . रविवारी माघ पौर्णिमा निमित्ताने प्रमुख भदंत डा आनंद महाथेरो, भंते कौडिन्य, भंते ज्योतीला, भंते खेमपलजी, भंते संघतीश्या, भंते शासन रक्तिया, भंते बिर्यानंद, यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी महाविहारत संपन्न झाला.
माघ पौर्णिमा निमित्ताने दरवर्षी या पहाडीवर धम्मदेसनेचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी भिक्खु संघास आणि उपासक उपाधिकांना भोजनदान देण्यात येते. या वर्षीचा कार्यक्रमात,the युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन च्या वतीने आणि रत्नागिरी महाविहार पहाडी उपासक संघाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, सकाळी 9.००वाजता भंतेजी संघाचे आगमन गोधनी गावात झाले तत्पूर्वी रत्नागिरी महाविहार पहाडी उपासक संघ गोधनी रेल्वे जुन्या गावासह लेआऊट आणि बोखारा, घोगली, मॉडर्न स्कूल, लोणारा, गुमथला, गुमथी, महादुला, चिंचोली, नांदा कोराडी, येथील उपासकांनी मोठ्याप्रमाणात या कार्यक्रमाची प्रसिद्धी सर्व पंचक्रोशीतील बुद्ध विहार मध्दे पत्रके आणि स्वतः जाऊन निमंत्रण दिल्याने मोठा उपासक/उपशिका श्वेतवस्त्र धरण करून हातात पंचशील ध्वज घेऊन भिक्कुसंघाच्या स्वागतासाठी गोधनी येथे हजर होते, गावातून पदयात्रेने सगळी मंडळी रत्नागिरी गोधनी रोड पहाडीवर हजर झाले मोठ्या शिस्तीने बुध्दसंघ आणि उपासक उपाशिका, पहाडीवर पोहोचले, पूज्य भंते कौड्डिन्य यांच्या नेतृत्वात बुद्धपूजा, परित्रांनपाठ आदरणीय भिक्खू आणि संपूर्ण भिक्खू संघांनी एक तालासुरात सुरू केल्याने संपूर्ण आसमंतात बुद्ध नामाचा एकच जप सुरू होता त्या शांततेत संपूर्ण परिसर अगरबत्ती, आणि गुलाबजल च्या सुगंधित वातावरणाने दरवळून गेला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रोशना ताई शुद्धोधन कोलते नगराध्यक्ष गोधनी नगरपंचायत, यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सभापती बांधकाम विभाग न प गोधनी आयुष्यमान राहुल मधुकर मनोहर हे होते. सकाळी १२वाजेपर्यंत पूजापाठ, परित्रनपट आटोपल्यावर सर्व उपासक, उपशिकांना सुरूची भोज देऊन कार्यक्रम ची सांगता झाली. या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या रत्नागिरी पहाडी महाविहारातील सर्व सदस्य, स्वयंसेवक, कार्यकर्त्यांनी जीवापाड कष्ट घेतले



