नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
कामगार मनोरंजन केंद्र, कोराडी कॉलनी येते दिनाक 11 एप्रिल ला दुपारी १२ ते ४ या वेळेत रक्तदान शिबिर सह रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले , सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोराडी कॉलनी आणि मागासवर्गीय युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विलास मोटघरे, मुख्य अभियंता, कोराडी २/६६० मेगावॉट प्रकल्प हे होते. तसेच विशेष उपस्थिती मुख्य अभियंता ३/६६० मेगावॉट चे चिफ इंजिनीयर सुदीप राणे , अधीक्षक अभियंता आधेवार, राजेश डाखोले, हे होते,
संचालन असिस्टंट इंजिनीयर हर्षल खंडारे मागासवर्गीय संघटना यांनी केले,
मुख्य अभियंता विलास मोटघरे या प्रसंगी उपस्थित जनसमुदायांना उद्देशून बोलले की, महात्मा फुले यांनी उच्चनीच,, अनिष्ट रुढी परंपरा, वाईट चालीरीती जुन्या काळात चालत आलेली चातुर्वर्ण्य व्यवस्थाते ला त्याकाळी सुरुंग लावला, त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवून मग त्यांनी मोठ्या कष्टाने दलीत स्त्रियांना शिक्षित केले, मात्र ते त्याकाळी सनातनी प्रवृत्तीला रुजली नाही जसे आज च्या काळात काही झाले की आपण सरळ दवाखान्यात जातो, कोणत्याही भोंदू बाबा कडे जात नाही म्हणून विधान्यानिष्ठ व्हा आणि आरोग्याला जपा असा गुरुमंत्रही दिला.
या आरोग्य शिबिरात बाय पी शुगर, पोटाचे विकार बाबत तपासणी केली, मेयो रुग्णालयात येथील रक्त पेठी चे सर्व डॉक्टर टीम उपस्थित होती ४१रक्त दातांनी रक्तदान केले


