नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
घोगली गाव कोराडी अगदी जवळ चे छोटे गाव असूनही शिवजयंती सर्व गावातील मुख्य रोड, बोरिंग जवळची नाली ची स्वच्छता करून आगळी वेगळी ग्रामस्वच्छता अभियान शिवमित्र परिवाराने राबवून जिल्ह्यात एक चांगला मेसेज दिला आहे.
दिवसभर गावातील पूर्ण स्वच्छता सायंकाळी 7 वाजता गावातील हनुमान मंदिर जवळ मोठा पेंडाल टाकून अतिशय आकर्षक अशी आरास करून छत्रपती, जानते राजे शिवाजी महाराज यांची फोटो चे पूजन सर्व शिवमित्र परिवार घोगली व समस्त गावकरी यांनी केलं नंतर छत्रपतींची आरती करण्यात आली, दुपारपर्यंत चौकातील सर्व रस्ते नाल्या स्वच्छ केले, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू होती, ग्रामीण जनतेचे आरोग्य चांगले रहावे आरोग्य चांगले राहिले तर स्वराज्यासाठी झटणारे मावळे नक्कीच शत्रूचा पाडाव करतात. ही जाणत्या राज्याची शिकवणीची खरोखर आज आठवण झाली, पेंडाल मध्दे छत्रपतींचा शिवशाहीर देशमुखांचा पोवाडा युवकांच्या रोमारोमात स्मुरण चढवत होता, एकंदरीत शिवमय वातावरण निर्माण झालेले होते. रात्री 7ते आगमनापर्यंत सुरूची भोजनदान सह कार्यक्रमाची सांगता झाली



