नागेश निकोसे
नागपुर जिल्हाप्रतिनिधी
नागपूर जिल्हा ग्रामीण भागातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत टायगर रिसॉर्ट आहे या ठिकाणी रात्री दोन वाजता सावनेरचे डीवायएसपी अनिल मस्के यांच्या गोपनीय पोलीस टीमने रेड मारली या ठिकाणी कॉकटेल पार्टी जुगार देह व्यापार आणि अवैध असलेले चरस गांजा एमडी यासारख्या पदार्थाचे व्यसन केले जाते अशी माहिती डीवायएसपी अनिल मस्के यांना मिळाली होती या ठिकाणी दहा ते बारा महिला आणि पंधरा ते वीस व्यक्ती आढळून आले रेड केली असता या ठिकाणी डान्स करून पैसे उधळत असल्याचे चित्र दिसून आले अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे या रेड मध्ये नागपूर जिल्हा आणि त्या बाहेरील महिला आणि पुरुष असे नावाजलेले व्यक्ती मिळून आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे या कारवाईमुळे खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल गिरी आणि त्यांच्या पोलीस स्टाफ यांचे धाबे दणाणले आहे खापा पोलीस स्टेशन येथील वसुली दार पन्ना हा वादग्रस्त व्यक्ती पुन्हा या कारवाईमुळे कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे या कारवाई संदर्भात खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल गिरी यांना फोन करून कारवाईबाबत माहिती विचारली असता त्यांनी माहिती न देता फोन कट करून दिला ही कारवाई झाल्याने नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार दोषी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कशा प्रकारची कारवाई करणार
