नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
न्यू कोराडी येथे विजेच्या शॉकने वानर गंभीर जखमी अवस्थेत
एसटीपी ३४७० केएलडी, न्यू कोराडी येथे विजेचा जोरदार शॉक लागून एक वानर गंभीर जखमी झाले. शॉक इतका तीव्र होता की वानराचे संपूर्ण शरीर जडलेल्या अवस्थेत होते.
घटनेची माहिती मिळताच वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे पदाधिकारी रजनीकांत गुलाबराव बोपचे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वनविभागाला तत्काळ सूचना देण्यात आली.
काही वेळातच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचून जखमी वानराला ताब्यात घेतले व पुढील उपचारासाठी नागपूर ट्रांजिक ट्रीटमेंट सेंटर (वन्यजीव उपचार केंद्र) येथे दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणांनी विद्युत तारा व उघडी वायरिंग सुरक्षित करण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.



