नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
गुरुवारी सकाळी भर दिवसा शेतकरी सेलीब्रेशन हाॅल समोर एक महिला व युवकाने मिळुन एका इसमाचा चाकुने वार करुन हत्या केली,
उपराजधानीत गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले असून, आज दिवसाढवळ्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. एका महिला आणि पुरुषाने मिळून या व्यक्तीवर चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की, गंभीर जखमांमुळे पीडित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खापरखेडा-कोराडी मार्गावर ही घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सागर वानखेडे (रा. सावंगी, ता. नरखेड, जि. नागपूर) असे असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेच्या वेळी सागर वानखेडे हे MH-31-D-1425 क्रमांकाच्या दुचाकीवरून त्या मार्गाने जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रस्त्यावरच अचानक दोन आरोपींनी सागर वानखेडे यांच्यावर धारदार चाकूने वार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार इतक्या अचानक घडला की रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी हा संपूर्ण घटनाक्रम उघड्या डोळ्यांनी पाहिला. मात्र आरोपींच्या हातात चाकू असल्यामुळे कोणीही मदतीसाठी पुढे जाण्याचे धाडस करू शकले नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले हत्या केल्या नंतर आरोपिनी खापरखेडा पोलीस स्टेशन ला सलेडंर केले



