नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
आज सकाळी संघदीप बुद्ध विहार कोराडी येथून पंचक्रोशीतील बंधुभागिनी पदार्थ वस्त्र परिधान करून संघदीप विहारामध्दे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भंते धम्मकीर्ती यांनी सर्व उपासक उपासकांना त्रिसरण पंचशील दिले. विहारात नास्टा केल्यानंतर डी जे च्या गाडीवर डा बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावलेला होता आणि रॅली शिस्तबद्ध रित्या वंजारी भवन ते महादुला टी पॉइंट ते शिवाजीनगर एन एच 47 वरून थेट पाई पाई स्मृतीनगर मॉडर्न्सचूल ला वळसाघेत वापस महादुला टी पॉइंट वर समाप्त झाली दरम्यान भीमसैनिक, समता सैनिक दल, रमाई महिला मंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी 8 दिवस आधीच सर्व प्लॅनिंग करण्यात आलेली होती १७ नगरपंचायत वॉर्ड मधील बुद्ध विहार प्रमुखानी दर रविवारी बुद्धविहार येते मीटिंग होत असायची, त्या नुसार सर्व समितीच्या वरिष्ठ लोकांनी रचनाबद्द असे नियोजन केले आज सकाळी राजू बारमाते सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वॉक फॉर युनिटी walkethon मधील सर्व भीम बांधवांना चणा पोहा वितरण करण्यात आले,, पंचशील दुपट्टे वाटप ची जबाबदारी पंकज ढोणे माजी सभापती बांधकाम नगरपंचायत महादुला यांनी स्वीकारली उन्ह प्रखर असल्याची त्यांनी पांढरी टोपी त्यावर जयभीम निळ्या अक्षरांनी अधोरेखित केले होते, निळे ध्वज फडकत होते एकच साहेब बाबासाहेब, जबतक सूरज चांद रहेंगा बाबा तेरा नाम रहेंगा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला,डी जे वरील नादंन… नादन ह्या गीतावर युवती, महिला यांनी जोरात ठेका घेतला होता रॅली इतकी शिस्तबद्ध होती की,पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कोणताही त्रास झाला नाही वॉक फॉर युनिटी मध्दे दोन/दोन च्या जोडीने भीमसैनिकानी मार्गक्रमण केले रॅली जयभीमनगर च्या पुढे आली असता तेथील नागरिकांनी बिस्कीट आणि पाणी बॉटल सर्वांना वाटप केले पुढे बजरंगनगर बोखारा आडपुल जवळ थंड लस्सी देण्यात आली, मॉडर्न स्कूल मधील महिला मंडळांनी आई रमाई चे नांदन… नांदन हे गीत डी जे वर लाऊन लेझीम चा जोरदार नृत्याने अक्षरशः सर्वांनीच त्यांचे कौतुक केले दीपाली सोनटक्के, तभाने ताई, वासे मॅडम आणि काही शाळकरी मुली च्या संचाचे लेझीम वर नेत्रदीपक डान्स केला. येते सरबत देऊन वॉक फॉर युनिटी चे पुढे कॉलनी गेट नंबर 1वर परमपूज्य बाबासाहेब चा उंच असे पोर्ट्रेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता तिथे बऱ्याच भीमसैनिकांनी वाकून वंदन करत गेट नंबर २वर थंड पाणी पिऊन नगरपंचायत महादुला च्या प्रथम नागरिक हेमलता मनोज सावजी यांनी थंड पाण्याच्या बॉटल्स सर्वांना दिल्या समापन कार्यक्रम महादुला बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झाला समितीचे सदस्य ईशांत मानवटकर यांचा वाढदिवस जोरात भीमगीतावर जल्लोष करत साजरा करण्यात आला यावेळी राजेश रंगारी,, मनोज सावजी, अभिजीत ढेंगरे,, महानिर्मिती चे कल्याण अधिकारी अमरजित गोडबोले,रत्नदीप रंगारी पन्नालाल रंगारी, सिद्धार्थ शेंडे, मिलिंद गाडेकर पंकज ढोणे, कपिल पाटील, सचिन पाटील सामाजिक कार्यकर्ता,राहुल मंडपे, बापुराव सोनवणे, बापुराव जिभे, मैत्रेय गाडेकर, सम्राट भालाधरे, मयुर, अश्विन मानवतकर, विनोद रंगारी, अर्चना मंडपे, निशांत पाखिड्डे, बाळू पाखिड्डे सिद्धार्थ आवळे, संजय चालखोर, पूनम पाखिड्डे, अपर्णा मिलिंद गाडेकर, हर्षल खंडारे मागासवर्गीय कामगार युनियन चे नेते तथा स्विस सहायक, दीपक आवळे, प्रणाली रंगारी, दर्शना रंगारी माजी जिल्हापरिषद सदस्या,, चित्रलेखा मानवतकर, अयुब परिपगर, आणि खूप मोठ्यासंखेने भीमसैनिक आणि समतासैनिक उपस्थित होते


