नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महादुला ढेंगरे लेआऊट. धुळस लेआऊट वस्ती ला लागूनच असलेल्या हर्षल हिंगेनकर या युवा कार्यकर्त्याने छोटे स्वतःचे उद्योग चालवणारे युवा उद्योजकांचा मेळाव्याचे सफल आयोजन त्यांच्या कार्यालयात रविवार सायंकाळी ६.३०वाजता केले त्या प्रसंगी ना चंद्रशेखर बावनकुळे मंत्रीमहोदय संबोधन प्रसंगी म्हणाले की आपण माझ्या निवडणुकीच्यावेळी खूप कष्ट घेऊन रात्रीचा दिवस केला आणिं म्हणून आता तुमच्या मताचे कर्ज फेडणे ही माझी जबाबदारी हे. माझ्या जनसंवाद मध्दे कधीही या मी आपले काम अग्रक्रमाने करेल.
सध्या राज्यमंत्रीमंडळ मध्दे असल्या सोमवार ते गुरुवार मुंबईत असावे लागते, शुक्रवार अमरावती शनिवार सदर डी पी डी सी सभागृहात जनसंपर्क असतो आपण लेखी निवेदन डायरेक्ट माझ्याकडे द्यावे मी त्यावर निश्चितपणे कारवाई करतोच कधी खूप व्यस्त दौरा असला तर आपण मला वॉट्साप मेसेज करु शकता, त्यावर आपले पूर्ण नाव
मोबाईल नंबर, समस्या थोडक्यात लिहावी मी जरी दिवसभर दौऱ्यात असलो तरी रात्री १०पासून ११.३०या वेळेत कार्यकर्त्यांचे मेसेज वाचून संबंधितांकडे पाठउन त्यांचे काम मार्गी लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आपण छोटे रोजगार करणारे आहात आपला उद्योग अधिक कसा वाढवायचा त्याबाबत केंद्र/राज्यसरकार च्या योजनेतून भांडवल कसे मिळवावे याबाबत माझा प्रयत्न राहील आपण माझ्या निवासस्थानी हर्षल हिंगणेकर च्या माध्यमातून या निश्चितपणे तुमचे काम होईल
यावेळी महादुला नगरपंचायत क्षेत्रातील भाजप कार्यकर्ता उद्योजक मनोज सावजी, भाजप गटनेते अभिजित ढेंगरे आणि नगरसेवक, गोपाल नईकाणे, राज उईके नगरसेवक, पवन पाखिड्डे नगरसेवक,, सचिन पाटील, भाजपाध्यक्ष महादुला शहर,भाजप बूथ प्रमुख मनोज पवार, अजय वाणी, अरुण उजवणे, दिगंबर ढेंगरे, तुरकजी, सिद्धार्थ शेंडे, भाजपा शक्तीप्रमुख नाना लांडे, संदीप घुरीले, गज्जी मानवटकर, रुपेश गौतरे, अर्जुन चपडिया, आणि मोठ्याप्रमाणात ज्येष्ठ तरुण भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यांना अल्पोहर देण्यात आला, यावेळी माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे देखील समायोचित भाषण झाले मंचावर ज्येष्ठ भाजपा कार्यकारिणी सदस्य सुधीरजी दिवे, उपस्थित होते


