नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135 व्या जयंतीनिमित्ताने संघदीप बुद्ध विहार कोराडी येथे लोकनेते व राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, तसेच सुगत सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांचा बावनकुळे साहेबांचे हस्ते सत्कार करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सर्वाना शुभेच्छा देण्यात आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महादुला टी पॉईंट येथे बाबासाहेबांचे जीवन चरित्र साकार करण्याकरिता डिजिटल पद्धतीने हायटेक करण्याबाबत सूचना देण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने गजूजी यादव, माजी नगराध्यक्ष राजेशजी रंगारी, माजी सरपंच नरेंद्रजी धानोले, माजी उपसरपंच आशिषजी राऊत, कुणालजी भोसकर, लोकेशजी वरोकर, संघदीप बुद्ध विहार व सुगत सार्वजनिक वाचनालय कोराडी येथील प्रमुख पदाधिकारी पन्नालालजी रंगारी, विजयजी वाघमारे, विनोदजी रंगारी, राजेश बारमाटे, मनीष मेश्राम, सुरेंद्र सोमकुमार, प्रशांत पाटील, विशाल बारमाटे, सुमेध वाघमारे, जयंत रंगारी, महिला प्रतिनिधी प्रणाली रंगारी, रंजना वाघमारे, कविता वाघमारे, माया मेश्राम, माया बारमाटे, सविता बोरकर, शारदा वंजारी, प्रणिता सोमकुवर, मंजुषा रंगारी, रत्नमाला बारमाटे, शितल तागडे, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वाघमारे व आभार प्रदर्शन पन्नालाल रंगारी यांनी केले.


