नागेश निकोसे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
२७ फेब्रुवारी, नांदा कोराडी येथिल ए एम सिनेमा मध्दे रमाई चित्रपटाच्या पहिल्या प्रीमियर शो ला प्रत्यक्ष माता रमाई ची भूमिका करणारी नागपूर ची प्रसिद्ध नटी प्रेरणा धाबर्डे यांची कोराडी चित्रपट गृहात आल्याने नागपूर जिला भाजपा चे उपाध्यक्ष तथा मां. नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले याप्रसंगी महादुला नगरपंचायत अध्यक्ष सौ हेमलता मनोज सावजी या देखील उपस्थित होत्या
माता रमाई ची भूमिका करणाऱ्या प्रसिद्ध रंगकर्मी तथा चित्रपट अभिनेत्री प्रेरणाताई धाबर्डे यांनी महिलांना असे आवाहन केले की प्ररमपूज्य बाबासाहेब यांना घडवणे आणि मोठे करण्यात माता रमाई यांनी त्यांना मानसिक बळ दिले. त्यामुळेच बाबासाहेब निसंकोच विदेशात जाऊन उच्च शिक्षित होऊन इतके प्रकांड पंडित बनले विविध देशाच्या घटनेचा अभ्यास केला, अनेक धर्मग्रंथ वाचून काढलीत, परंतु त्यांनी बुद्धाचा खरा सन्मार्गावर चालणारा सत्य आणि निसर्गावर विश्वास ठेवणारा बुद्ध धर्म प्रिय वाटला. सोबतच त्यांनी भारत देशाची अतिशय महत्त्वाची घटना लिहिली, त्यासाठी त्यांनी आपल्या तब्बेतीची काळजी देखील घेतली नाही इकडे माता रमाई प्रचंड कष्टाने गोवऱ्या विकून घरखर्च भागवत होत्या त्यांचा त्यानेच भारताला बाबासाहेब आंबेडकर नावाचा हिरा मिळाला म्हणून आपण या चित्रपटातील माता रमाई चे कष्ट, त्याग सर्व जनतेला सांगावा आणि जास्तीत जास्त महिलांनी, बहुजन, वंचित, आदिवासी भगिनींना हा चित्रपट बघण्यासाठी नक्कीच सांगावे असे आवाहन प्रेरणा धाबर्डे यांनी या प्रसंगी केले. यावेळी हेमलता सावजी अध्यक्ष महादुला यांनी देखील प्रेरणा धाबर्डे यांच्या चित्रपटात साकारलेल्या रमाई मातेच्या हुबेहूब भूमिकेचे मनभरून स्तुती केली. या प्रसंगी, नगरसेविका आम्रपाली सोनारे,, महादुला नगरपंचायत उपाध्यक्ष वैशाली पाखिड्डे , नगरसेविका स्वाती लांडे, नगरसेविका स्वाती पटले, नंदा तुरक, नगरसेविका गजभिये ताई,, विशेष पुढाकार शिवसेना शिंदे गट चे नगरसेवक सचिन वानखेडे, यांनी घेतले. त्यांचे समवेत, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना नेते सुधीर धुरिया पत्रकार शैलेश ढोरे विद्याताई वानखेडे बोधिसत्व झोडापे उपसरपंच लोणखैरी ग्रामपंचायत, तसेच खापरखेड्याच्या सरपंच मीनाक्षी तागडे , ग्रामपंचायत सदस्य सौ अपर्णा मिलिंद गाडेकर यांनी देखील भेट घेतले



